प्राण प्रिय रामदास. ..!
प्राण ओवाळून टाकावा तुझ्यावरून
आणि तुझ्या झुंजार पावलाखाली सांडाव्यात
दुःखीतांच्या आसवांच्या फुलांच्या रांगोळ्या
सर्वत्र मोहरलेल्या स्वप्नांच्या घनदाट जंगलात
असा बहरून आलेला पावसाळा तुझ्या डोळ्यात मी पाहिला आहे.
अकोल्याच्या मराठी साहित्य संमेलनात तू गरजलास
आणि तुझ्या पँथर गर्जनेने पेंडाॅल तडकला...
तुझ्या पायांना भिंगरी. ..खांद्यावर झोळी. ..
झोळीत युगांच्या दु : खांची शिदोरी...
तेलाविना डोक्यावर फडकणारे विद्रोही केस. ..
वाढलेली दाढी. ....
सर्वांगातून वाहणार्या घामाच्या धारा. ..
आणि डोक्यात मात्र वणवा
या वणव्याच्या डोळ्यांना अश्रू ढाळताना मी पाहिले आहे.
नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर मी तुझे
बोट धरून नेले
तेव्हा तू माझ्या डोळ्यात पाहिले !
तू माझे बोट सोडलेस आणि -
माझ्या कवितेचे बोट धरलेस
तेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहिलं !!
जखमी डोळ्यांच्या भेटी सुध्दा
जखमालयातच होत असतात. .....
तुझी पँथर झेप मेघांना असह्य झाली
आणि तुझ्या डरकाळीने आभाळ तडकले
हे मी पाहिले आहे
नामांतराच्या बेताज बादशहा ...!
या मातीला कसे सांगू तुझे रक्त
कुठे सांडले नाही ते. ..
इथे हजारदा मेलास तूच
राखेतूनही पुनः उठलास तूच !!
आणि पुनः नव्या जिंदगीला
जीवदान दिलेस तूच. ..!!!
हे गाव कुणाचे आहे? ते अजून कळले नाही. ..
माझ्या कंठातून हे शब्द प्रश्नांकित होताच
तुझ्या अबोल डोळ्यातील मेघाळलेले आभाळ
मलाच कळले. ...मीच पाहिले आहे
कुणी दगडांनी पाय ठेचतात,तू पायांनी दगड ठेचलेत
काटे पायांना रूततात,तू पायांनाच
काट्यांच्या हवाली केलेस. ..!
तुझी वस्तीच झुंजारांची, शुरांची, योध्यांची, पराक्रमांची.
तुझ्या वस्तीची रात्र उपाशी पोटी निजली;
त्या रात्री तुला गगनात हंबरडा फोडतांना,
टाहोंच्या विजा कडाडतांना,
आणि घनघोर आकांत करून रडतांना
तुला मी पाहिले आहे. ..
तू मंत्री महाराष्ट्राचा. ..!
आणि माझ्या लहानशा ' वाळलेल्या काडी ' पुढे
हतबल होऊन ढसाढसा रडतोस. ..
तुझ्या आसवांनीच ' मलबार हिल ' हिरवळली. ..
तुझ्या काळजातील करूणेचा महापूर
तुझ्या अबोल डोळ्यातून असा वाहताना
मी पाहिला आहे.
तुझे निरागस, निष्पाप बालका प्रमाणे अलगद
हळूच हसणे पाहून
तुझी हजारदा पापी घ्यावी. ..!
की तुझ्या रणरणत्या उन्हातील रणसंग्रामात
उडी घेवून कुर्बान व्हावे. ..!!
शूरांचेही शूरत्व तुझ्या काळजात कुठून आले. ..?
कारूण्याचा महासागर तुझ्या कुशीत
कसा विसावला ?
तुझ्या डोळ्यातील अग्नी बनातील वणवाही
थरथर कसा कापतो ???
तुझ्या बाहूतील बलदंड छाया,
माझ्या झोपडपट्टीची सावली ...!
तुझ्या बुलंद छातीचा परकोट,
माझ्या झोपडीचे संरक्षण. ..
तुझा उंचउंच माथा
माझ्या हक्कांचे संवर्धन. ..
तुझे पँथरच्या पावलांचे ठसे
आभाळाच्या छाताडावर गाडून
एकेकाळची तुझ्या पायातली फाटकी स्लीपर
महालातील सम्राज्ञी झाली. ..
सम्राज्ञीच्या महालातील गारवा
आता प्रज्ञा होवून यावा. ..
आणि या झोपड्यांच्या अंधारातील
आसवांना त्याने नकळत पिवून घ्यावे...
कारण या वस्तीचा तू ' प्राण ही ' आहेस आणि ' प्रिय ही '
एवढ्याचसाठी प्राण ओवाळून टाकावा तुझ्यावरून
आणि तुझ्या झुंजार पावलाखाली सांडाव्यात
दुःखीतांच्या आसवांच्या फुलांच्या रांगोळ्या.
- पँथर भाऊ पंचभाई.

Comments
Post a Comment