मोदी लाटेवर स्वार होत तथाकथित संस्कृतीरक्षक एकामागून एक राज्य काबीज करत सत्तेत आले आणि *त्यांच्या मागे असणाऱ्या वैचारिक चाणक्यानी आपापल्या शेंड्याना गाठी मारायला सुरुवात केल्या* आता सगळे कसे मनासारखे होईल, आपली विचारधारा, आपली संस्कृती, आपला कायदा सर्व भारतावर लागू होईल या आनंदात सर्व जण वावरू लागले. परंतु गुजरात निवडणुकी मध्ये मात्र नेमकी माशी शिंकली आणि *आपल्या प्रतिमेची निर्माण केलेली लाट तिथे उसळलीच नाही आणि स्वतःच्याच तोंडाला फेस यायची वेळ यांच्यावर आली.* तशातच कसलेही राजकीय पाठबळ नसताना उना येथे झालेल्या दलित अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढलेला जिग्नेश मेवानी आमदार झाला. पाटीदार समाजातील हार्दिक पटेल याने तर यांच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला. त्याचे तोंड बंद करण्यासाठी भाजपेयीनी आपल्या पूर्व संस्कृतीला जागत हार्दिक पाटेलची कथित सी डी बाहेर आणली. *पण हार्दिकने अगदी प्रगल्भपणे "जनतेला विकासाची ब्लु प्रिंट पाहिजे, माझी ब्लु फिल्म नाही"* म्हणत भाजप वाल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला. इकडे जे एन यू चा विद्यार्थी कन्हैया कुमार भारतभर फिरत या लोकांच्या तोंडाला फेस आणत होता. *त्याला लोकांचा आणि विशेषतः तरुण भारताचा मिळणारा प्रतिसाद पाहता आधुनिक चाणक्याना आपापल्या शेंड्या परत सोडण्याची वेळ आली.*
देशात धार्मिक उन्माद सुरु करून धार्मिक दंगली होतील अशी शक्यता धूसर दिसू लागल्या नंतर जाती जातीत युद्ध छेडण्याची त्यांची योजना कार्यानवीत झाली.
त्याची रंगीत तालीम मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी घेतल्या गेली. *पण बुद्ध - शिव - फुले शाहू - आंबेडकर यांचे विचार समजापर्यंत पोचवणाऱ्या मा. खेडेकर साहेब-मा. म. देशमुख- डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विचारावर ज्यांचा पिंड परिपुष्ट झाला अशा मराठा समाजाने जातीय तसेच धार्मिक दंगलीला केव्हाच तिलांजली देऊन टाकली*. प्रतिमोर्च्याच्या आडून ही हा प्रयत्न करून पहिल्या गेला परंतु त्याला सुद्धा म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही.
आणि जेव्हा आपण टाकलेले प्रत्येक फासे हे आपल्यावरच उलटू लागलेले दिसू लागले तेव्हा ही मंडळी चवताळली. *ज्या पद्धतीने चवताळलेला कोब्रा स्वतःलाच चावे घेतो तशी यांची अवस्था झाली.* आणि कधीच पुढे न येणारा शत्रू आपलं हिडीस रूप घेऊन पुढे आला. याची दोन- तीन उदाहरणे आपल्याला पाहता येतील. पहिलं म्हणजे हेगडे ने *"संविधान बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत" अशा प्रकारचे केलेले वक्तव्य.* कदाचित ही लिटमस टेस्ट देखील असू शकते. की भविष्यात असा काही प्रयत्न झालाच तर समाजातून काय प्रतिक्रिया येतील याचा अंदाज घेण्यासाठी मुद्दामच केल्या गेलेले ते वक्तव्य असावे. *अर्थातच बहुजन समाजातील सर्व जातीय वर्गातून याचा तीव्र निषेध केल्या गेला. तेव्हा हेगडेना माफी मागावी लागली.* _अर्थात हा सगळा प्रकार म्हणजे तू मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो असाच आहे._
दुसरा प्रयत्न हा महाराष्ट्र दूषण बाबा पुरंदरे याचा स्वतःला परमशिष्य म्हणवणाऱ्या सौरभ कस्तुरे याच्याकडून कडून झाला. या महाशयाने छ. शिवाजी महाराजांनी रामदासाला म्हणे चाफळ प्रदान केल्याची सनद वगैरे सापडली आणि ती ही थेट इंग्लंड मध्ये सापडल्याची आवई ठोकली. विदेशी पुरावा सापडला म्हटल्यावर रामदासाला शिवरायांच्या डोक्यावर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना जोर आला. कारण ही सनद साधी सुधी नाही तर थेट इंग्लंड मध्ये सापडलेली. मग काय? *बाहेर देशातले शेण सुद्धा प्रसाद समजून खाणाऱ्या औलादी कामाला लागल्या.* जेम्स लेन सुद्धा बाहेरच्याच देशातला होता. परंतु लेन प्रकरणाचा अनुभव असलेले गजानन मेहेंदळे यांनी स्वतःच ती सनद चक्क बनावट असल्याचे म्हटले. आणि या समस्त विदेशी सनदवाल्यांच्या आनंदावर विरजण पडले. *पूर्वी सोनाराकडून कान टोचून घ्यावे म्हणायचे तसे आज त्यांच्याच इतिहासकाराकडून स्वतःच्या लबाड्या उघडकीस आणण्याचा प्रघात पडण्याची शक्यता आहे.* कारण संभाजी ब्रिगेडच्या अभ्यासकांनी तसा प्रयत्न केल्यास एकतर *यांच्या नको तिथे दुखणे सुरु होते आणि वरून संभाजी ब्रिगेड कशी ब्राह्मण द्वेषी आहे अशी हाकाटी पिटण्याचीही वेळ येते* म्हणून हे चाफळेचे सनद प्रकरण कस्तुरे-मेहेंदळे यांच्यातच मिटले हे बरे झाले.
_*पण या निमित्ताने एक बाब पुढे आली ती ही की शिवचरित्राला कलंकित करण्यासाठी देशी पुरावे कुचकामी ठरू लागले की याना विदेशी मस्तक आठवते हे सिद्ध झाले*_
हा प्रयत्न सुद्धा सपशेल फेल झाल्यानंतर आता वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीवरील पत्र्याचे शेड समाज कंटकांनी उखडून फेकल्याची बातमी आली. वर्तमानपत्रात आलेली गुन्हेगारांची नावे वाचून ही मंडळी सुद्धा मिलिंद एकबोटे आणि पर्यायाने महाराष्ट्र दूषण बाबा पुरंदरे यांच्याशीच संबंधित असल्याचे पुढे आले. कारण एकबोटे हे पुरंदरे यांचे मानसपुत्र असल्याची माहिती आहे. _(म्हणजे यांचे प्रताप पाहता, यांना पुढला महाराष्ट्र भूषण भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही)_
या महाशयांनी *संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर त्यांच्या ट्रस्टची परवानगी घेतल्या शिवाय कुणालाही कोणताच कार्यक्रम घेता येणार नाही अशा आशयाचे बॅनर लावले.* आणि समाधी स्थळावर मात्र केशव बळीराम हेडगेवार यांची तसबीर विनापरवाना लावली. हेडगेवार आणि छ. संभाजी राजे यांचा काय संबंध? *संभाजी राजेंच्या समाधी स्थळावर हेडगेवारांचा फोटो कुणाला विचारून लावला?* संभाजी राजांची समाधी म्हणजे यांच्या बाप जाद्यांना दिलेली जहागिरी आहे काय?
याच एकबोटे व त्यांच्या ट्रस्टशी संबंधित असणाऱ्या लोकांनी मागे गोविंद गायकवाड यांची माहिती देणारा फलक काढून टाकला होता. आता त्यांच्या समाधीवरील शेड काढून टाकले. पुढे मागे ती समाधी सुद्धा नामशेष करण्याचे प्रयत्न होऊ शकतात.
....आणि हे सगळे १ जानेवारीच्या भीमा कोरेगाव रणसंग्रामाला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. तिकडे शनिवारवाड्यात होणाऱ्या जिग्नेश मेवाणी यांच्या कार्यक्रमाला सुद्धा पेशव्यंच्या आजच्या वंशजांनी विरोध केल्याची बातमी आहे. *जिग्नेश मेवानी यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यापेक्षा या वारसांनी छ. शिवाजी महाराजांचा लाल महाल कुठे गेला याचे उत्तर देण्यासाठी आपली शक्ती खर्ची घालायला हवी.*
थोडक्यात काय शत्रू चवताळला आहे, बेभान झाला आहे आणि काहीही करून त्याला महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे सामाजिक स्वास्थ्य खराब करावयाचे आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम युवकांनी भावनिक न होता शांतता राखून आपली दमदार वाटचाल चालू ठेवली पाहिजे.
जय जिजाऊ !!!
Comments
Post a Comment