आठवले/ सुचले म्हणुन पाठवले

बाबा तूमचा फोटो
भगव्या पोष्टरवर दिसू लागला
तूमच्या नावाचे पत्ते
रामदास पिसू लागला

बाबा!
समाजासाठी तुम्ही आटवले रक्त
तुमचा दास झाला रामाचा भक्त
ढुंगणाचं काढुन डोक्याला नेसू लागला
तुमच्या नावाचे पत्ते
रामदास पिसु लागला

मेंढीकोट तीन पत्ता
रामदासाला पाहीजे सत्ता
सत्तेसाठी निळं फेडून
भगवं नेसू लागला
तूमच्या नावाचे पत्ते
रामदास पिसू लागला

बाबा
नामांतराला विरोध ज्यांनी केला
त्यांचाच आज हा झाला चेला
*व्यास*पिठावरील गर्दीत
बळेच घुसू लागला
तूमच्या नावाचे पत्ते
रामदास पिसू लागला

बाबा
जनतेच्या कल्याणासाठी
तूम्ही काढला रीपब्लिकन पक्ष
या नेत्यांनी केलं जनतेलाच भक्ष
दाढी वाढलेला रामदास
शंकराचार्यच भासू लागला
तूमच्या नावाचे पत्ते
रामदास पिसु लागला

बाबा
ऊभा करण्या पक्ष तुम्ही रक्त आटवले
याने निळ्या झेंड्याला जानव्यात गोठवले
निळ्या झेंड्याखालचा हळूच
भगव्या गर्दीत घुसु लागला
तुमच्या नावाचे पत्ते
रामदास पिसू लागला ....!!!!
✍✍एक भिमसैनिक ✍✍
पटल तर शेअर करा...
🙏🙏🙏जय भिम 🙏🙏🙏

Comments