न्याय- अन्याय


कोपर्डी कळली तुला
नितीन आगे कळला नाही
खुनात रक्ताचा पडला सडा पण
तुझा जीव हळहळला नाही

भैयालाल भोतमांगे कुढून कुढूून मेला
सांगाल का प्रियंकाला न्याय काय दिला
आयबहिनी मानणारा लाख समाज
ढवळला नाही की खवळला नाही

सारेच निर्दोष होते तर ,घेरलं तर कोणी
खुनी कोणीच नव्हते तर मारलं तर कोणी
सारी गुपित रातोरात विकली
कोट तुझा लिलावात डागळला नाही?

संविधान हाती तुझ्या ,तुझ्या हाती जाती
जाती जातीमध्ये मला वाटतेय भीती
तुझ्या जातीमध्ये कसा कोणी नाही दोषी
दुसऱ्याच्या जातीला मरेपर्यंत फाशी
जातीच्या चिखलात तू लोळला नाही

योगायोग कसा होतो कळतच आहे
रमाबाई अजूनही जळतच आहे
सरकारी खातो आणि सरकारी पितो
समतेचा न्याय तुला कळाला नाही

Comments