हो मी जिंकणारच

संकटांनी खचून न जाता,
संकटांना वेचून - वेचून संपवा.

स्वराज्यावर मिर्झाराजा आणि दिलेरखान चालून आले.
राज्य धोक्यात आले.
आणि
माझ्या शिवरायांसमोर शरणागती शिवाय दूसरा मार्गच उरला नाही.
शेवटी मोगलांना मोठी संपत्ती
आणि नविन स्वराज्याचे "२३किल्ले" द्यावे लागले.
उरले फक्त "१२" किल्ले.
म्हणजे ७०% स्वराज्य मोगलांना द्यावे लागले.
आत्ता पर्यत जे बलिदानाने, घामाने जे कष्टाने मिळवले.
ते सर्व मोगलांच्या घशात गेले.

आता काय करायचे???
सगळे संपले.
सर्व वाया गेले.
आपली संपत्ती दुसऱ्याची झाली.
स्वराज्याचे स्वप्नं भंगले.
पुरंदरचा तह झाला.
आता सारे संपले.
स्वराज्य संपले असेच सर्वांना वाटले.

हा प्रसंग घडला १३ जून १६६५ ला
"पुरंदरचा तह"

आणि
काही दिवस गेले,
महिने गेले,
वर्षे गेली
आणि,

आणि...

९ वर्षे ६ दिवसांनी
तो दिवस उजाडला.

६ जून १६७४
""शिवराज्याभिषेकाचा दिवस.""
आणि
या दिवशी स्वराज्यात किल्ले होते

"३६१"

किती ???

       "३६१"

कुठे १२ गड शिल्लक राहिलेले स्वराज्य??
आणि
कुठे ३६१ किल्ल्यांचे स्वराज्य..??

  ""लक्षात येतय का हे शिवतंत्र""

*एखाद्या संकटाने खचू नका.
*पराभवाने मार्ग सोडू नका.
*अपमानाने धेय्य सोडू नका.
*बदनामीने भरकटू नका.
*पाय खेचले म्हणून थांबू नका.
*संधी गेली म्हणून रडू नका.
*यश नाही आले म्हणून कार्य बदलू नका.
*लोक म्हणतात म्हणून मागे फिरू नका.
*जे माझ्या शिवरायांच्या बाबत घडले
*ते तुमच्याही बाबत घडेल.
*सर्वस्व जाईल.
*बरबाद होताल.
*होत्याच नव्हते होईल.
*सगळे संपेल.

त्या वेळी माझ्या शिवरायांचा वरील प्रसंग आठवा.
माझ्या शिवरायांचे शिवतंत्र आठवा.

*सांगायचा उद्देश हाच आहे की*
*अनुकूल परिस्थितीत सगळे मोठे होतात*
*पायवाटेने सगळेच जातात*
*दुसऱ्याच्या कष्टाने सगळे मोठे होतात*
*दुसऱ्याच्या मदतीने सगळेच*
*यश मिळवतात*
*पण*
*खरे मर्द तेच असतात*
*जे लढून विजयी होतात...*
*बापाच्या जीवावर कुणीही उड्या मारेल*
*या झाल्या माकडउड्या.*
*पण स्वतःच्या जीवावर उड्या मारणारे*
*खरे नरसिंह असतात...*
*प्रवाहा बरोबर तर दगड पण वाहतात*
*पण प्रवाहाच्या विरोधात वाहणारे*
*खरे हीरे आणि हिरोच असतात.*

*हे शिवतंत्र आपण आचरणात आणले पाहिजे*

*आता तुम्ही काय करणार???

*आलेल्या संकटाला घाबरणार?

*माघारी फिरणार???

*नाही, कदापिही नाही, कधीच नाही.
*मी त्या शिवरायांचा छावा आहे.
*वादळातला दिवा आहे.
*मी लढणार, शेवट पर्यत लढणार, हरलो तरी लढणार,
*पडलो तरी लढणार, तो पर्यत लढणार,जो पर्यत विजयी होत नाही.

*आणि मी जिंकणार, जिंकणार म्हणजे जिंकणार।।।

               * ""हो मी जिंकणारच"" *
        
                 

                      "जय शिवराय"

Comments