दुःखी मला भासली होती |
म्हणून त्यांच्या डोळ्यात,
आसवं मला दिसली होती |
शिवाजी राजे कडाडले,
सांग सा-या मावळ्यांना |
शिवराय नाहीत समजले,
त्या तरूण बावळ्यांना |
शिवजयंतीला फौज सारी ,
बार मध्ये घूसली होती |
म्हणून त्यांच्या डोळ्यात,
आसवं मला दिसली होती |
अहिल्यामाई काल रात्री,
मनामधेच रडल्या होत्या |
मुर्तीसमोर गुटखा पुड्या,
पोरांनीच फोडल्या होत्या |
बंधने झूगारून कशासाठी,
तलवार आम्ही घासली होती |
म्हणून त्यांच्या डोळ्यात,
आसवं मला दिसली होती |
जेंव्हा जेंव्हा तरूण हातात,
शिगारेट इथे पेटत असते |
महात्मा फुल्यांचं मन तेंव्हा,
क्षणा क्षणाला तूटत असते |
आज सगळ्या तरूणाईवर,
सावित्रीमाई रूसली होती |
म्हणून त्यांच्या डोळ्यात,
आसवं मला दिसली होती |
आण्णाभाऊंनी जर तेंव्हा,
असाच मार्ग धरला असता |
तर त्यांचा पहाडी आवाज,
महाराष्ट्रभर फिरला नसता |
त्यांना माणनारी पिढी आज,
व्यसनामध्ये ग्रासली होती |
म्हणून त्यांच्या डोळ्यात,
आसवं मला दिसली होती |
सरते शेवटी बाबासाहेब,
मनातून खूपच हळहळले |
आंबेडकरी अनुयायांवर,
भिमराव खूप कळवळले |
आंबेडकरी चळवळ आज,
व्यसनामध्ये फसली होती |
म्हणून त्यांच्या डोळ्यात,
आसवं मला दिसली होती |
महाराष्ट्र भूमी तुकोबांची,
नामदेव, सावता माळ्याची |
गाडगे बाबा, तूकडोजींची,
जनाई अन् चोखा मेळ्याची |
तरीही आज या काळोखात
सारी मायभूमी बसली होती |
म्हणून त्यांच्या डोळ्यात,
आसवं मला दिसली होती |
Comments
Post a Comment