भीमा कोरेगाव चा लढावु इतिहास बदलू पाहणार्यांना जाब विचारा

आंबेडकरी तरूणानों जागे व्हा!
भीमा कोरेगाव चा लढावु इतिहास बदलू पाहणार्यांना जाब विचारा !!
----------------------------
गेली काही दिवस एक पोस्ट wats up वर फिरत आहे. भीमा कोरेगावच्या लढ्याला यंदा २०० वर्ष होत आहेत त्यानिमित्त काही मंडली कार्यक्रम घेवू इच्छितात जे ठीक आहे मात्र ही लोक आपला व्यक्तिगत अजेंडा राबविण्यासाठी भीमा कोरेगावच्या सदर लढाईचा इतिहासच बदलू पाहताहेत जे अत्यंत निंदनिय व आक्षेपार्य आहे.

इंग्रज सैन्यातील प्रामूख्यान असलेल्या महाराष्ट्रतील "महार'' व मद्रास मधिल "परिहा" या दलित जातींच्या मर्दुमकीनेच पुण्यात            ०१ जानेवारी १८१८ रोजी पेशवाई गाडली गेली हा  इतिहासच ही मंडली नाकारण्याचा उद्दामपणा करताहेत.

दलितांनी पेशवाई गाडली हे यांना "पचत" नाही म्हणुनच या लढ्यात पेशवाई विरोधात फक्त दलितच नव्हते तर "मराठा, राजपुत + इत्तर हिंदु, मुस्लिम, क्रिश्चन" ही होते अन अशा बहुजातीय लढ्यामुळच पेशवाई हरली अशी "फेकम-फाक" ही 'अती-डावी', 'अती-आंबेडकरी', 'अती-ज्ञानी'  ...सर्वच 'अती' असलेली मंडली करत आहेत. या नादात ते या ऐतिहासिक युद्धाला एका ठीकानी इतीहासातील 'बंड' अस  म्हणतात...

इंग्रजांंच्या सैन्यात १६ मराठा,  ८ राजपुत ई. होते (व ते आपल्या अस्मिता साठी पेशवाईशी लढले) अस हे अती-ज्ञानी म्हणतात मग पेशवाईचे सैन्यात तर प्रामूख्यान मराठाच होते....त्यांंच्या सोबत हजारो मुस्लिम (अरब) ही होते हा इतिहास नाही दिसला का या अती-ज्ञानी लोकांना??

खर पाहता इंग्रज सैन्यात प्रामूख्याने (जवळ जवळ निम्म्याने) "महार" अन "परीहा" या दलित जातीचे सैनिक होते मात्र पेशवाई सैन्यात तस काही नव्हत म्हणुनच हे युद्ध स्वाभिमानी "दलित" विरुध्द जात्यांध,मनुविकृत "पेशवे (यात पेशवाई सैन्यातील माजलेले मराठा व ई. हिंदु ही) अस होत.

या युद्धात दलितांची "सरशी" झाली. पेशवे (त्यांंच्या सोबतचे मराठा, इत्तर हिंदु वगैरे) मारले गेले, शरण आले, पळले हा इतिहास आहे ज्याकारणास्तव दलितांनी पेशवाई गाडली अस म्हटल जात.

दलितांच्या मर्दुमकीच, शौर्यच निशान म्हणुन १८२१ साली भीमा कोरेगाव ला इंग्रजांनी "जय स्तंभ" उभारला आहे. दलितांच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणुनच बाबासाहेब ०१ जानेवारीला सदर स्तंभास भेट देत..आज पर्यंत किती राजपूत, मराठा, मुस्लिम, ईसाइ भीमा कोरेगाव ला गेलेत हे या अती-ज्ञानी लोकांकडून कळल तर बर होईल.

भीमा कोरेगाव येथील दलितांच्या जाज्वल्य इतिहासाची तोड-मोड करणारी पोस्ट खाली देत आहे त्यात संबंंधीत 'अती' लोकांचे कॉंटेक्ट नम्बर ही त्यांनी दिले आहेत.

स्वाभिमानी दलित तरुणनी या 'अती' लोकांना फोन करून जाब विचारावा.

             🙏  जय भीम
               मिलिंद भवार 🙏

अती-ज्ञानी लोकांची पोस्ट:👇🏽
------------------------------------
------------------------------------

" चलो मुंबई...      चलो मुंबई...

         एक जानेवारी २०१८
    भीमा कोरेगाव शौर्यदिनाची
         २०० वर्षे निमित्ताने

           ----निमंत्रण----                                                       

          नव्या पेशवाई विरोधात

       नव्या लढाईचा कृतिकार्यक्रम                                                                              
    

एक जानेवारी २०१८ रोजी भिमाकोरेगावाच्या मुक्तीसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. ब्राम्हणी धर्माच्या पायावर उभ्या राहीलेल्या पेशव्यांच्या जुलमी राजवटीला उखडून फेकणारे हे घनघोर युध्द भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलं. ५०० पायदळ आणि २५० घोडदळ बहूजातिय सैनिकांनी दिलेल्या या जिकरीच्या लढाईत ५० जणांना विरमरण आले. कोण होते पेशवाई विरोधातल्या या युध्दाचे शिलेदार ?
२२ महार, १६ मराठा, ८ राजपूत व इतर हिंदू, २ मुस्लीम आणि १ ख्रिश्चन असे हे विविध जाती धर्माचे लोक एकजूटीने जिवाच्या आकांताने पेशव्यांविरोधात लढले. अस्तित्व आणि अस्मितेसाठीचा हा संघर्ष होता. आणि त्याच समान धाग्याने ते गुफंले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातील या बंडाला भिमाकोरेगाव स्तंभाजवळ सलामी देत म्हटले होते कि, " आपल्या पूर्वजांना म्हणजे त्या वेळच्या महारांना असे स्वकियांविरूध्द म्हणजे पेशव्यांविरूध्द इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले हा इतिहास फारसा भूषणावह नाही. परंतू त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचा तो परिपाक होता." आणि म्हणूनच भिमाकोरेगावची ही लढाई आजही जातिअंताचं प्रतिक आहे. आणि आज जेव्हा जातिअंताच्या इतिहासाला आणि प्रतिकाला गिळंकृत करून त्याचे ब्राम्हणी करण करण्याचा सपाटा सरकार कडून सुरू झालेला आहे. अशा वेळी सरकारचा डाव उधळून लावण्यासाठी भिमाकोरेगावच्या जातिअंताच्या प्रतिकाला उभे करायची गरज आहे. कारण हे प्रतिक जातिव्यवस्था, धार्मिक- सांस्कृतिक शोषण व दमनाविरूध्द तसेच पेशवाईला गाडणारे प्रतिक आहे. भिमाकोरेगाच्या लढाईच्या द्विशताब्दी निमित्त आपण 'भिमाकोरेगावचं' प्रतिक आजच्या पेशवाई विरूध्द प्रतिकामध्ये रूपांतरित करण्याची गरज आहे.
भिमा कोरेगाव मुक्तीसंग्रामाची द्विशताब्दी अशा काळात आली जेव्हा मागील तीन वर्षांपासून देशात आणि महाराष्ट्रातही पेशवाईचा आधुनिक वारसा चालवणाऱ्या ब्राह्मण्यवादी शक्तींचे सरकार आलेले आहे. हिटलरप्रमाणेच ते लोकशाही पद्धतीने सत्तेत आले. सत्तेत येताच त्यांनी तथाकथित लोकशाहीचा मुखवटा बाजूला फेकला व सरळ हिटलरचा चेहरा धारण करून भारतीय राज्यघटनेचा खात्मा करायला त्यांनी सुरुवात केली आहे. मनुस्मृतीची घटना आणून आधुनिक पेशवाईची स्थापना करायला सुरुवात केली आहे. या मोहिमेत काही 'आंबेडकरी' नेते सत्तेच्या तुकड्यासाठी सामील होऊन गद्दार झालेले आहेत.
'पेशवाई' फँसिझमचे प्रकट रुप आहे. आजच्या या पेशवाईचा म्हणजे आधुनिक ब्राह्मण्यशाहीचा देशी भांडवलदार, सरंजामदार अभिन्न भाग आहेत. आणि त्यांच्याच बळावर साम्राज्यशाही येथे आजही अप्रत्यक्ष राज करीत आहे. भारतासकट संपूर्ण जगच आर्थिक संकटाच्या खोल खोल गर्तेत फसत चालले आहे. या संकटाच्या परिणामीच मोदी-ट्रम्प सारखे फॅसिस्ट सत्तेत विराजमान होत चाललेले आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ब्राह्मण्यवादी सत्ताधारी वर्ग एकीकडे नवउदारवादी विनाश धोरणे जनतेवर लादत आहेत. विकासाचा हैवान साम्राज्यवादी विश्वबँक वित्तभांडवल यांच्या माध्यमातून थैमान घालतो आहे. त्यातून जल जंगल जमीन व इतर नैसर्गिक संसाधनाना जनता वंचित होऊन तिचे जीवन उध्वस्त होत आहे व त्याचे गोचर रुप देशभरचे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथोरिटी (MRDA), स्मार्ट सिटी, सेझ, इंडस्ट्रीयल कॉरिडार...आहे. दुसरीकडे आपला हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचा ब्राह्मण्यवादी अजेंडा राबवण्यासाठी आर.एस.एस.ने ब्राह्मणी सांस्कृतिक हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कष्टकरी जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. नोटबंदी, जीएसटी, सेझ ते बीफबंदी, लव्हजेहाद, गोरक्षा... ही त्यांची नावे आहेत. माणसांचा बळी देऊन, माणसं विभाजित करून, माणसं भयभीत करून हिंदूंच्या नावाखाली 'ब्राह्मण राज' साकार केला जात आहे.
या ब्राह्मण्यवादी अजेंड्याची गुलामी पत्करली तर ओबीसी/दलिताला प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीही बनवले जाते. आणि तोच त्यांच्या अजेंड्याचा पर्दाफाश केला तर गोळ्या घालून ठार मारले जाते. हा सत्ताधारी वर्ग अत्यंत धूर्त आहे. त्याने व आर.एस.एस.ने मराठा क्रांती मूक मोर्चा च्या मागे लपुन दलित आणि मराठा समाजाला एकमेकाविरोधात लढवायचा प्रयोग नुकताच करून पाहिला.
'पीडित वर्ग' जुन्या पद्धतीने जगायला तयार नाही आणि 'शासक -शोषक वर्ग' जुन्या पद्धतीने शासन करू शकत नसेल तर ही 'क्रांतीच्या' दृष्टीने चांगली वेळ आहे. रोहित वेमुला प्रकरण, आंबेडकर भवनवरील हल्ला, उना प्रकरण, भीम आर्मी प्रकरण, हेमंत करकरे यांच्यासह दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या, अखलाक-जुनैदवरील हल्ले, आदिवास्यांना संपविण्यासाठी सरकारने चालवलेले सलवा-जुडूम व ऑपरेशन ग्रीन हंट, सेझ, पिंजरा तोड प्रकरण... यातून हे स्पष्टपणे दिसून आलेले आहे. पण हेही तितकेच खरे की, आजची ब्राह्मणशाही तंत्र-व्यवस्थापकीय बाबतीत खूपच सज्ज आहे. जनतेला विभाजीत ठेवण्यात व विद्रोहींना व्यवस्थेमध्ये सामावून घेण्यात ती खूपच चलाख आहे. अफाट सरकारी तंत्र व  RSS च्या हजारो शाखांमार्फत ती योजनाबद्ध पद्धतीने कार्यरत आहे आणि याप्रकारे तिने 'क्रांती' दृष्टीआड केली आहे.
आपण हजारो गटातटांत व संघटनांमध्ये विखुरलेलो आहोत. त्यामुळे नव्या पेशवाईला गाडण्यासाठी म्हणजेच जात वर्ग स्त्री दास्याचा अंत करण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. आपण स्वतःला भीमा कोरेगावचे वारस समजत असू वा प्रेरणा घेत असू तर आजच्या पेशवाईच्या खात्म्याची जबाबदारी आपल्यावर येते. अडथळे आणि संकटे गंभीर आणि भयावह आहेत खरे, पण ते ओलांडताच येणार नाहीत असं नाही. आपल्यात मतभेद आहेत. मतभेदांसहित आपण सारे एकत्रित येऊया आपल्या कॉमन शत्रूशी लढण्यासाठी. आंबेडकरवादी, लोकशाहीवादी, डावे व पुरोगामी जनसंघटना व सामाजिक-सांस्कृतिक संघटना एकत्र येऊन एक व्यापक संयुक्त आघाडी बनवता येईल. ही आघाडी ब्राह्मण्यशाही च्या चौफेर हिंसक-वैचारिक हल्ल्यांविरोधात प्रश्न आधारित एक रॅडिकल संयुक्त संघर्ष निर्माण करेल. एकता आणि अंतर्गत मैत्रीपूर्ण संघर्षाच्या भूमिकेतून ही वाटचाल करता येईल.
ही आघाडी जनएकता, जनप्रतिरोध व जनपर्याय निर्माण करून खऱ्या आजादी कडे वाटचाल करण्यासाठी एक मंच म्हणून काम करेल. कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, विद्यार्थी, युवा, महिला, कर्मचारी, सांस्कृतिक गट, पत्रकार, बुद्धिजीवी, पुरोगामी व्यक्ती इत्यादींचे प्रतिनिधी व जनसंघटना एकत्रित येऊन या आघाडीचे भाग बनतील.
आपल्या सर्वांच्या सूचना व सहकार्याने एक भूमिका व कृतिकार्यक्रम विकसित करावा यासाठी मुंबईत ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी एक विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील विविध जनसंघटना, सामाजिक संघटना व पुरोगामी व्यक्तींना या बैठकीचे निमंत्रण देणारे आम्ही खालील निमंत्रक निमित्तमात्र आहोत. आपल्या सर्वांच्या सहभागाने एक संयोजन समिती तयार व्हावी व तिने ठोस कृतीकार्यक्रम आखावा व द्विशताब्दी वर्षात संपन्न करावा अशी अपेक्षा आहे.

यादृष्टीने आपण विचार करावा व बैठकीला यावे ही विनंती.

बैठकीचे संभावित विषय-

१)भूमिका किंवा उद्देश.

२) भीमा कोरेगाव द्विशताब्दी निमित्त ठोस कृती कार्यक्रमाची आखणी करणे.

३) जबाबदारीचे वाटप करणे.

४) प्रचार-प्रसार-प्रकाशने.

५) निधी उभा करणे.

आपले

---- निमंत्रक----

पी.बी. सावंत, रावसाहेब कसबे, बी. जी. कोळसे पाटील, ज. वि. पवार, विलास वाघ, भाई वैद्य, एस.एम.मुश्रीफ, नागेश चौधरी, सुरेश खोपडे, सागर सरहदी, सुरेश खैरनार, आनन्द तेलतुंबडे, अरविंद सोनटक्के, शाहीरा केशरबाई जैनू शेख, उर्मिला पवार, उषा अंभोरे, राम पुनियानी, नजूबाई गावित, वाहरू सोनावणे, प्रदीप गायकवाड, उत्तम जागिरदार, हिरामण पगार, पन्नालाल सुराणा, विवेक सुंदरा, यामिनी चौधरी, विद्या बाळ, इंदिरा आठवले, सुषमा देशपांडे, प्रज्ञा दया पवार, सुषमा अंधारे, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन, वैशाली पाटील, रेखा मेश्राम, विजया चव्हाण, वंदना शिंदे, रुबिना पटेल, दिशा शेख, श्रावण देवरे, मुकुंद सपकाळे, रामू रामनाथन, सुदाम वाघमारे, वीरा साथीदार, जिंदा भगत, गोपाल नायडू, जयदेव डोळे, प्रा. रमेश कांबळे, विजय कांबळे, महेश भारतीय, प्रदीप ढोबळे, अभय कांता, विवेक सोनार, अजिझ पठाण, फिरोज मिठीबोरवाला, अंजुम इनामदार, मानव कांबळे, इब्राहीम खान, प्रा. जावेद शेख, अनंत लोखंडे, उल्हास राठोड, सुधाकर कश्यप, सुरेश भोसले, डॉ. भारत कारिया, सुमनताई वाघ, मायाताई सोरटे, अँड. संगीता गायकवाड, राजेंद्र कांबळे, सुप्रिय बनसोडे, सिद्धार्थ गायकवाड, शंतनू कांबळे, डॉ. संग्राम मौर्य, भारत शिरसाठ, प्रकाश इंगळे, सतीश पट्टेकर, बुद्धप्रिय कबीर, सुबोध मोरे, केशव वाघमारे, विशाल हिवाळे, सुनील शिंदे, अझहर खान, राहुल वाघ, विशाल साळवे, गणपत भिसे, नितीन सावंत, राजेश घोडे, मनीषा तोकले, प्रा. उषा सरदार, विवेक मोरे, नितीन चंदनशिवे, शिल्पा सावंत-'उर्मी', धम्मसंगिनी, ईशान संगमनेरकर, सुनील तात्या धिवार, विवेक मवाडे, प्रा. दिनकर दळवी, राज घरडे, सूर्यकांत कांबळे, चंद्रशेखर भारती, निशांत शेख, सागर गोरखे, ज्योती जगताप, अँड.रत्नाकर डावरे, दत्ता पोळ, शब्बीर देशमुख, सुब्रतो चौधरी, पवन भगत, नागेश रत्नपारखी, नरेंद्र सोनार, अनिल म्हमाणे, राजवैभव कांबळे, सचिन बनसोडे, डॉ. धर्मेंद्र रामटेके, विश्वजित मिठबावकर, फुलचंद जावळे, दीपक डोके, नागेश जाधव, गणपत गुंजाळ, संतोष कांबळे, चेतन गांगुर्डे, एकनाथ गोंगले, बंडू घोडे, विष्णू सोनवणे, सुमेध जाधव, शरद गायकवाड, सुधीर ढवळे

-------संपर्क------
शरद गायकवाड 9702707583
सुमेध जाधव 9029268778
सुधीर ढवळे 8369468301
सुबोध मोरे 9322025263
विजय कांबळे 9987851677
संतोष कांबळे 8446950450
हर्षाली पोतदार 8369297441"
-------------------------------
---------------------------------

Comments