आपला राष्ट्रपीता!

गांधीजी हरीजनांसाठी देशभर फंड गोळा करत होते.
आणि त्याच दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटलांनी  मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह सुरू केलं होतं.
(आणि त्याच्या उद्घाटनाला योगायोगाने गांधीजी आले होते)
पण नंतर वसतिगृहाची परिस्थिती एकदमच हलाखीची झाली.
भाऊराव पाटलांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेऊन कसातरी हा प्रपंच पुढे नेणाचा प्रयत्न केला होता.
आणि प्रबोधनकार ठाकरेंना समजलं की गांधी फंड गोळा करत त्याच बाजूने येत आहेत.
म्हणून पटकन त्यांनी भाऊराव पाटलांना आपल्या सोबत घेतलं व गांधींना सर्वच परिस्थिती समजावून सांगितली.
(आणि वसतिगृहाच्या मुलांसाठी यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवले आहेत हे सुध्दा सांगितले)
पण त्याचा गांधीवर काहीच परिणाम झाला नाही.
मग प्रबोधनकारांनी गांधींना फंड किती जमा झाला ते विचारलं
गांधी म्हणाले साडेतीन लाख रूपये जमा झाले आहेत.
मग प्रबोधनकार म्हणाले की
मग त्यातूनच भाऊरावला काही मदत करा.
गांधी म्हणाले की
पैसा जवळ नसताना नको ते उद्योग भाऊरावला कोणी सांगितले होते करायला?
मी सध्या काय मदत करू शकत नाही
मला तुम्ही एक महिन्याची मुदत द्या ठाकरे.
पण प्रबोधनकार गांधींना म्हणाले की
एक महिना नाही जास्तीत जास्त दोन तीन दिवस आम्ही तुम्हाला देऊ.
मग गांधी म्हणाले की,
ठीक आहे मी तसं तुम्हाला पत्राने कळवीन.
(पण नंतर कधीच पत्र आलं नाही)
नंतर प्रबोधनकार गांधींना म्हणाले की,
बरं तुम्ही पैशाची मदत करू नका
पण ती वसतिगृहातील मुलं सध्या कशी काय जगत आहेत ते तरी आपल्या डोळ्यांनी पहा.
तेव्हा गांधी पटकन म्हणाले की
आता मला एक महत्त्वाची मिटींग आहे  गांधी पटकन उठला आणि तरातरा चालू लागला..

असा होता आपला राष्ट्रपीता!

(पण गांधी प्रबोधनकाराशी इंग्रजीत बोलत होते
आणि प्रबोधनकार हिंदीत)
कारण हिंदी बोलायला गांधीचा लाज वाटत असे.
(सदर उतारा हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवन गाथा" या आत्मचरित्रातला आहे)

Comments