*बीजेपी सरकारने अघोषित आणीबाणी लागु केली आहे याचा तंतोतंत अंदाज आज खरा ठरला.*
*सोशल मिडीयावर काही तरूणांनी बीजेपी सरकार व मोदींवर टिका टिपन्नी केली म्हणुन नोटीसा काढल्या....*
*जे सरकार मिडीया व जाहिरातबाजी करूण सत्तेत आले तेच आज या सोशल मीडियाला घाबरू लागलय....*
प्रधानमंत्री मोदी आणि भाजप यांच्यावर राजकीय स्वरूपाची टिका केल्यामुळे किंवा टीकात्मक पोस्ट सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध केल्यामुळे काही पोस्टकर्त्याना पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये नोटीसा दिल्या आहेत असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
*राजकीय स्वरूपाची टिका केल्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारची नोटीस देणे म्हणजे अधिकाराचा दुरुपयोग करणे आहे.*
एखाद्या व्यक्तीच्या बेकायदेशीर कृतीमुळे अथवा वक्तव्यामुळे एखादा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता आहे असे पोलीस अधिकाऱ्यास वाटले किंवा कोणी तशी तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे केली तर त्याची पडताळणी करून पोलीस अधिकारी संबंधित व्यक्तीला कलम १४९ अन्वये नोटीस बजावू शकतात.
तसेच संबंधित व्यक्तीच्या हातून खरेच गुन्हा घडण्याची शक्यता आहे अशी पक्की खात्री असेल तर फौ. प्र. सं. कलम १४९ अन्वये नोटीस बजावून झाल्यावर लगेच त्या व्यक्तीस भा.दं, वि.कलम १५१ अन्वये अटकेची कारवाई करू शकतात.
*मात्र एखाद्या राजकीय पक्षावर अथवा राजकीय व्यक्तीवर निव्वळ राजकीय स्वरूपाची टिका केली म्हणून अशी कारवाई करणे व्यक्तीच्या घटनात्मक मुलभूत अधिकाराचा भंग ठरतो.*
*यास न्यायालयात आव्हान दिल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते.*
टिका करणारी व्यक्ती जर शासकीय सेवेत असेल तर ती व्यक्ती शिस्त व अपील नियमाच्या अंतर्गत कारवाईस पात्र ठरू शकते.
Comments
Post a Comment