माझी मानस कन्या आशु जगताप यांची ही पोस्ट.
घटना सोलापूरची नुकतीच दीड वर्षापूर्वीची...
मी पाहिलेली जोगतिण.......
"जोगतिण" या विषयावर खुप आधीच लिहायला घेतल होत. मी पाहिलेल भयानक वास्तव. अगदी माझ्यासमोरच सगळ घडत होत. मी अशीच एका ठिकाणी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. अगदीच खेडेगाव होत ते. काही अन् कसलीच सुविधा नसणार गाव. माझी मैत्रिणही तशी गरीबच तिच्या आग्रहाखातर गेले त्या ठिकाणी. सगळाकाही पहिलाच अनुभव माझा. वातावरण अगदीच वेगळ तिकडच सगळीच देव देव करणारी माणस. अगदी तरुण मुल सुद्धा तशीच शिक्षण सोडुन देव देव करत बसणारी. साधारणताः दुपारी पोहोचले मी तिकडे. गावात येतानाच वेशीवर भल मोठ देवीच मंदिर पाहिल अन् त्याला लागूनच आराधी अन् जोगवा मागणार्या बायकांची वस्ती पाहिली. खुप विचित्र च वाटल आधी पाहून कारण हे सगळ मी आधी सिनेमा अन् मालिकांमध्येच पाहिल होत. तिच्या घरी पोहोचल्यानंतर थोडी फ्रेश झाले आणि तडख त्या दिशेने निघाले. काहींनी अडवल सुद्धा तिकडे जाण्यासाठी पण मला मात्र तो प्रसंग पाहायचा होता. शेवटी तिचा च भाऊ मला तिकडे घेऊन गेला. पुढच भयान वास्तव.....
खुपच उत्साहात होते मी जाताना. अनुभव खुपच वेगळा माझ आयुष्य बदलवणारा होता. तसा तीच्या भावाने मला आधिच कल्पना दिली होती तिकडे काय चालू असेल त्याची. शेवटी पोहोचलीच तिथे मी काहीच माहित नसल्याने अगदी जवळच जाऊन उभी राहिले. तिकडचे काही रागाने पाहू लागले माझ्याकडे. माझ्यासोबत असलेल्या मुलाने माफ करा हं नविन आहे ती अस बोलून मला मागे खेचल. एका झाडामागे उभ राहून मी सगळ पाहात होते. सुरुवातीला काहीच समजत नव्हत कारण अगदी दहा वर्षापासुन ते अर्ध वय झालेल्या बायका अन् मुल तिकडे होती. मुल??? मुल कस म्हणू मी त्यांना कारण त्या मुलांनी अन् पुरुषांनी साडी नेसली होती. त्यांच पुरुषत्व जाणूनबुजून संपवलय हे स्पष्ट दिसतच होत प्रत्येकांच्या चेहर्यावर. ते निरीक्षण करताच एका मुलीला ओढत तिकडे आणल जात होत. साधारणतः अठरा वर्षांची असेल ती मुलगी. अगदिच गोड दिसणारी. गोरीपान, घारे डोळे अन् कंबरेएवढे केस. अगदिच निरागस होती ती. लग्नासाठी जस एखाद्या मुलीला तयार करतात अगदी तशीच नटली होती ती. पण नशिबाचा खेळच वेगळा होता. लग्न तर होत हो तिच पण मुलाशी नाही तर एका झाडाशी अस्तित्त्वात नसलेल्या देवाशी. नकळत तिच माझ्याकडे लक्ष गेल. का कोण जाणे पण तिच्या डोळ्यांतुन तिची तळमळ मला आधीच समजली होती. तिकडे जो जमाव होता त्यापैकी मी नक्कीच वेगळी आहे हे तिला समजल होत. तिच ते निरागस बघण मला स्वताः आरोपी असल्याच भासवत होत.
पिवळी साडी हिरवा ब्लाउज त्यात ती अजूनच उठुन दिसत होती. गावचे सगळे तर उपाशी असल्यासारखे तिच्याकडे पाहात होते. लाळगळे कुठले, तिला एका पाटावर बसवल गेल बाजूनी सगळ्या जोगतिणी जमल्या. एका कळशीत हळदीच पाणी आणि त्यात लिंबाची पान होती. एका मध्यम वयाच्या बाईने त्या कळशीमधल पाणी तिच्या अंगावर ओतल. पाणी थंड असल्याने तिने अंग आकसल, अगदीच बावरली ती जणू काही एखाद्या कळी सारख तिच सौंदर्य खुलल होत, ती भिजलेली असल्यामुळे साडी तिच्या अंगाला चिकटली होती त्यात ते तिच्या अंगावर पडलेल पिवळ पाणी आणि चेहर्यावर आलेले ओले केस तिच ते सौंदर्य अगदीच मोहून टाकणार होत. तिला पाटावरुन उठवल तसे गावातले काही तरुण आणि पार दात नसलेले म्हातारे पुरुष तिचा नजरेन बलात्कार करत होते. कधी एकदा तिची चव चाखता येईल अशी सगळ्यांची तोंड झाली होती. तिला भल मोठ कुंकु लावण्यात आल. तिच्या केसांना थोड मोकळ करुन त्यावर भरमसाठ गजरे लावण्यात आले. तिच्या कंबरेला लिंबाची पान गुंडाळली. हे सगळ चालू असताना सगळ्या देव्यांचा जयजयकार चालू होता. मुख्यतः लखाबाईच्या नावान चांगभल अन् यल्लमा देवीचा उदो उदो अस त्या आराधी बायका ओरडत होत्या. तिला एका झाडाजवळ आणल त्या झाडाखालीच कोण्या देवाचा देव्हारा तयार केला होता. त्यातल्याच एका साडीतल्या पुरुषाने पुढाकार घेऊन तिचा व त्या देवाचा त्यांच्या पद्धतीने लग्न लावण्याचा विधी संपन्न केला. बहुतेक तो त्यांचा गुरु असावा. आजपासुन तु देवाची दासी झालीस. देवीची सेवा हेच तुझ आयुष्य अस तिला ओरडुन सांगून तिच्यावर भंडारा उधाळला गेला. झाली ती आता जोगतिण...
जोगतिण, देवदासी म्हणजे काय हो नक्की. "आता आपली सोय झाली राव आज रात्री पहिला डाव मी च मारणार" हे अस एका तरुणाकडुन मी ऐकल. ऐकुनच डोक्यात सणक गेली. जोगतिण म्हणजे गावजेवण. कोणीही कसही वापराव तिला. भिक्षा मागताना घरात ओढून पार तिला पिळून टाकाव. जोगतिण आणि वेश्या दोघी समानच दुःख भोगत असतात. सगळा कार्यक्रम आटोपला. तिच तोंड पार कोमेजून गेल होत. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात नको असलेल गुलामीच मंगळसुत्र , कवड्याच्या माळा अन् कपाळावर भल मोठ कुंकु अन् भंडारा अस हे तिच आताच जोगतिणीच रुप. हे सगळ आटोपताना संध्याकाळ झाली. माझी घरी जाण्याची ईच्छाच होईना कारण पुढचा प्रसंग पाहायचा होता. मैत्रिणीचा भाऊ मला समजवून थकला होता पण माझ्या हट्टापुढे त्याच काहीच चालल नाही. त्या जमावाच्या मागे आम्ही गेलो थेट त्यांच्या वस्तीवर जाऊन पोहोचलो. त्याने पुन्हा मला मागे खेचल. बाई निघूया आता इथुन मी तुझ्या पाया पडतो अशी त्याची पुटपुट. तिकडची वस्ती अन् राहाणीमान मला पाहायच होत. तिकडची घर अगदीच लहान म्हणजे अगदी छोट किचन आणि रुम त्यात अंघोळीसाठी बाथरुम नाही. त्या वस्तीचे निरिक्षण करत असताना मागून कोणीतरी खांद्यावर हात टाकला, घाबरले अन् मागे पाहिल तर त्याच वस्तीत राहणारी एक बाई होती काय काम आहे गं?? असा तिचा प्रश्न. मला काय बोलाव काहीच सुधारल नाही. माझ्यासोबत असलेला मुलगा तिला समजावत होता. ती माझ्याकडे पाहुन हसली अन् म्हणाली पोरी नविन दिसतेस गावात मी सुद्धा होकारअर्थी मान हालवली. तिने तिच्या घरात बोलावल जाव कि नाही हा प्रश्न होता. शेवटी धीर करुन गेले तिच्या मागे स्वभावावरून अत्यंत छान वाटत होती ती बाई. घरात गेल्यावरच तिचा तो भला मोठा देव्हारा. साधारणतः सात वाजले होते. पोरी घेशील का गरीबाचा चहा अस तिने विचारल, मी नकारार्थी मान डोलावली. साधारणतः ती तिने वयाची तिशी गाठली होती. तिने मला वय, शिक्षण, कुठे राहाते ह्या अशा गावभर चौकश्या केल्या आणि मी सुद्धा तोडकी मोडकी उत्तर दिली कारण तिच्या घरातल्या त्या धुपाच्या, अगरबत्तीच्या अन् कुंकवाच्या वासाने माझ डोक उठल होत. तिथून निघण्याचा निर्णय मी घेतला. दाराजवळ येताच एक माणूस दारात आला, पोरी जा बाई लवकर घरी अस काळजीन ती म्हणाली त्या माणसाच्या नजरेतुनच तो कशासाठी आला हे समजत होत आम्ही बाहेर पडल्यावर त्यान जोरात दार आपटल...........
एक भयान वास्तव मी पाहिल. जोगतिण म्हणजे खरच गावजेवणच असत. कोणीही बोलवाव तिला, जणू काही प्रसादच, कोणीही आपली गरज पुरवुन घेत स्वताःच्या उभ्या राहिलेल्या झेंड्यांना शांत करण्यासाठी गावातले लोक या जोगतिणी कडे येतात. कोणीही याव अन् टानकन् वाजवून जाव. लाजा नाही का हो वाटत अस शरीर सुंगायला देवाच्या नावाखाली स्वताःची आग विझवायला किती जोगतिणींचा बळी घेता तुम्ही. तुमचा सलामी देत असलेला झेंडा झोपला की मग तिला शिव्या देऊन तिथून निघून जायच. तिने लग्नासाठी विचारल तर जोगतिणीशी कोण लग्न करुन घेईल अशी तुमची उत्तर. अहो मग तिच्यासोबत झोपताना नाही का आठवत हे सगळ. तिला पार पिळून काढल्यावर तिच्या गजर्यांचा चुराडा केल्यावर साली गावजेवण म्हणून तिथून निघून जाता तुम्ही पुरुष. आधी तिच शरीर सुंगायच तिच्या ओठांना पार पिळवटून काढायच स्वताःची आग विझवायची अन् मग तिला तसच पाडुन निघुन जायच.......
जोगतिणीच आयुष्य च अस असत मंदिरातल्या घंटेसारख कोणी ही येत अन् वाजवून जात. ती कोणा कडेही तक्रार करु शकत नाही. पोट भरण्यासाठी स्विकारते हे काम देवीच्या नावाखाली करते स्वताःची विक्री. होतात मग तिला नको ते रोग, सडते मग ती पुर्णच पडून राहाते एका कोपर्यात. तिला खाऊन खाऊन पार तिचा रस काढलेला असतो. सुकलेल्या शरीरानी मरणाची वाट बघत खितपत पडलेली असते ती.................जोगतिण
संकलन
आशु जगताप
Comments
Post a Comment