गुंठा-गुंठा जमीन विकून
आम्ही निवडणूक लढवली
एकमेकांच्या जिरवाजिरवीत
आम्ही आमचीच जिरवली!!
त्याच्या पोराचा लग्न मंडप
आमच्या दरवाजापर्यत आला
मी भी एकराच तुकड विकून
पोराच्या लग्नात धिंगाना केला!!.
घरादार गहाण ठेऊन
आम्ही आमच च घोड नाचवलं!!
गुंठा गुंठा जमीन विकून आम्ही
ग्रामपंचायत सोसायटी लढवली
.एकमेकांची जिरवा जिरवित
आम्ही आमची जिरवली
.एकराचे तुकडे विकून आम्ही
जेडपि पंचायत ची हाउस देखील पूरी केलि
नेत्यांचे प्लेक्स लावताना आम्ही आमची च हवा केलि
.लोकांच्या लग्नात पटकुरे बाधताना
पार मान मोडायचि बारी झाली
.गावाच्या विकासाच्या गप्पा मारत आम्ही
आमच्या घरचीच आधोगती केली.
मान पान सत्कार स्वीकारताना
आमची छाती फुगून गेली पण
बाजारात आमची पत मात्र खाली गेली .
जिरवा जिरविच्या नादात आम्ही आमची च जिरवली .
गुंठा गुंठा करत सारी जमीन गेली
आणि एक दिवस घर सोडण्याची पाळी आली
माझ्या नादात त्याची गेली आणि
त्याच्या नादात माझी गेली .
घरदार जमीन गाड़ी माड़ी बॅंकेनी लिलावत नेली
.आम्हाला तोंड लपवायचि पाळी आली
आणि नेत्यांनी देखील आमच्या कड़े पाठ फिरवली
जिरवाजिरविच्या नादात आम्ही आमची च जिरवली .
ज्याना बोध घ्यायचा त्यांनी नक्की घ्यावा पुढच्या पीढ़ी करता नवा आदर्श द्यावा .
Comments
Post a Comment