रामदास आठवलेजी,
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री.
आजच तुमच्या पक्षाची(गटाची) उद्याच्या दिवसाच्या ६०व्या वर्धापनाच्या दिवसाची पोस्ट आणि फोटो पाहिलेत. शिर्डीत तुम्ही या निमित्ताने सभा घेतलीही आहे. ते पाहुन मी आश्चर्यचकीत झालो! कारण *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(आ)* असे दुकान तर २५ मे १९९९ रोजी स्थापन झाले. आणि त्या अगोदर तुम्ही *दलित पॅंथर ऑफ इंडीयाचे* नेतुत्व केले. एकतर तुम्ही स्वयंघोषित नेतुत्व आणि वर तुम्ही दुकान मांडलेत, त्यात तुमच्यात पाच पैश्याची लोकशाहीतील तत्वे दिसत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी या २६ जानेवारी १९५० ला देशाला *रिपब्लिकन गणराज्य* केले. ३० सप्टेंबर १९५६ला शेकाफेला बरखास्त करुन त्यानी स्वातंत्र्य, समता, बंधुता न्यायावर आधारित सर्वसमावेशक असा *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया पक्ष भारतीय जनतेला दिला.* परंतु ठरावानंतर २ महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. मग त्यांच्या संकल्पाला त्यांच्या अनुयायानी व सहकार्यानी या पक्षाची ३ ऑक्टोबर १९५६ रोजी स्थापना केली. या पक्षाच्या घटनेत महान अशी जागतिक सात तत्वे दिली. त्यातील ७ अंश गुणही तुमच्यात दिसत नाही. पक्ष स्थापनेच्या काही कालानंतर अंतर्गत मतभेदाने पक्ष कमकुवत झाला व तो गवई घराण्याचा झाला. त्यानंतर पक्षाच्या नावाने अनेक राजकिय पक्ष स्थापन झाले. *'रिपब्लिकन'* असे नाव तर दिले पण केवळ बदनामीकारकच कृत्य ह्या अनेक पक्षानी केले. त्यात तुम्हीही अव्वल स्थानी आहात पक्षाला स्वार्थापोटी आणि स्वयंघोषणेने तुम्ही औपचारिकरित्या पक्ष चालविला व इतरांच्या हातातील बाहुले बनुन वर्ष काढले. आजही तुम्ही *भाजप* पक्षाचे बाहुले आहात. खरतर तुम्हची समाजाला काहीही गरज नाही तुम्ही भाजपमध्येच विलीन व्हा व तुमचा गटही विलीन करा. तुमच्या सारख्या नेतुत्वाला पाहुन आज तरुणाला लाज वाटत आहे. आमच्या समाजाच प्रतिनिधित्व करतात कि कॉमेडी शो करतात तेही समजत नाही. कोणत्याही मंचावर कविता त्याही हास्यास्पद. आपण राजकिय सन्यास घ्यावा चळवळीच्या इतिहासात असाही आपणास 'लाल' शेराच मिळणार आहे.
मुख्य मुद्द्यावर येतो, आपण जी दिशाभुल चालु केली आहे कि तुमच्या दुकानाचा 'वर्धापन दिन' आहे. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी *'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया'* असा पक्ष स्थापन झाला असा कोणताही पक्ष अस्तीत्वात नाही. तो पक्ष आज गवईकडे जरी असला तरी ते स्वत: घरचा मालिकीचा पक्ष असल्यासारखे वागतात .त्यानीही ब्रॅकेट मध्ये गवई नाव दिले. तुम्ही ही जनतेची दिशाभुल थांबवावी. तुमच्या पक्षाला १८ वर्ष पुर्ण झालीत ६० नाही.( आठवले गट - २५ मे १९९९) तुम्ही त्या दिनांकावर वर्धापन सोहळे घ्या. कुणाचीही हरकत नसणार पण असे खोटे प्रकार करुन जनतेची दिशाभुल करु नका.
आंबेडकरी जनता जागरुक आहे अभ्यासु आहे. ती तुमच्या अशा बेगडी धोरणाला पाठिंबा देणार नाही.
राकेश अढांगळे
*The Republican*
Comments
Post a Comment