प्रिय मोदीजी, विषय - आता कस वाटतय....

प्रिय मोदीजी,

विषय - आता कस वाटतय....
__________________
महोदय,
          एनडीएने आपणास पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषीत करुन आज चार वर्षे पुर्ण होत आहेत.  आपल्या निवडीने भाजपमध्ये आणि रा.स्व.संघामध्ये बिनपाण्याची नशा चढली होती.   *हर हर मोदी, हर घर मोदी म्हणजे तुमच्या नावाने प्रत्येक घरात "भांग" तयार होत होती.!*  नशेत माणसाला समोरचा काय करतोय हे पक्के समजत असते पण आपला लेंगा किती ओला झालाय हे काही समजत नाही.  अगदी तसेच तुमच्या सैन्याने *सोशल मिडीयावर धुमाकुळ गाजवला होता.!* देशाच्या *स्वातंत्र्यसंग्रामाची जेवढी चर्चा सत्तर वर्षात झाली नाही तेवढी सात महिण्यात "साठ साल का हिसाब दो" म्हणत तुम्ही घडवुन आणली. !*  स्वाईन फ्ल्युची लागण व्हावी तशी काॅंग्रेस विरोधी द्वेशाची लागण तुम्ही घडवुन आणली अर्थातच सोशल मिडीयाचा  H1N1 वापरुन. तुमचा सारीपाट तयार होता आणि सोंगट्याही. विकाऊ मिडीयाचा रिमोट आणि सोशल मिडीयाच्या *चवताळलेल्या घोड्याचा लगाम दोन्ही तुमच्या हातात होते. !*

मोदीजी, तुमच्यासाठीच्या टीममध्ये काम करणार्‍या एका मुलीच्या पुस्तकातुन अशी माहिती मिळालीय की तुम्ही निवडणुकीपुर्वी हजारो *पगारी मंडळी मैदानात उतरवली होती.!*  सोशल मिडीयासाठी छोटे मॅसेजेस, भडकावु पोस्ट, अक्षेपार्ह फोटो, काटछाट केलेले व्हिडीओ, फेक संभाषणांचे आॅडीओ क्लिप्स ही मंडळी तयार करत होती.! *व्हाॅटसअॅप, ट्वीटर, फेसबुक अशा माध्यमातुन जोडलेला मोठा मतदारवर्ग तुम्ही अक्षरशः वेडा करुन सोडला.!*  तुमच्या चहाच्या पहिल्या कपापासुन ते आत्ताच्या सेकंदापर्यंतची हालचाल प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये फिरत असे.  तुमची अफाट उर्जाशक्ततीची भाषणे तासनतास टिव्हीवर चालु असायची. तुमच्या नवनवीन कल्पना, योजना, घोषणा कानात कैद होत होत्या. भारताचे आता नंदनवन होणार एवढा आशावाद प्रत्येक भारतीयाच्या मनात तयार झाला होता परंतु खरेतर तो आशावाद मनात नाही तर *मोबाईलमध्येच राहीलाय.!*  हल्ली तुम्हाला *फेकु, थापा, झुठा अशी नावे दिली जातात.!*  वास्तवीक पाहता *पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला असे संबोधने चुकीचे आहे !!*  पण चार वर्षांपुर्वीच्या तुमच्या टीमचे मनमोहन सिंग विषयींचे मॅसेजेस वाचले की यात गैर काहीच वाटत नाही. वैयक्तीक टिकाटिप्पनीची मर्यादा तुमच्याकडुनच आधी ओलांडली गेलीय हे आता वेगळे सांगायला नको.!

*पेट्रोल दरवाढ, फसलेली नोटाबंदी, जिडीपी घसरण, जीएसटीचा बोजा, सीमेवरुन दररोज देशाला भेट मिळणारे शहीद सैनिक, अंतर्गत असुरक्षीतता, पत्रकारांची हत्या, गोरक्षकांचा उच्छाद, जातीय तणाव, बेरोजगारी अशा कित्येक समस्यांनी तुमच्या भोवतीचे कोळ्याचे जाळे घट्ट होत  !!!*

आहे. अशा परीस्थीतीत लोकांसमोर बोलण्यासाठी तुमची *छप्पन इंचांची छाती पुढे येणारच नाही.  !!*

तुम्ही आता निवडणुकांचा शोध घ्या. लवकरच गुजरातमध्ये लागतील तेव्हा *मेरे प्यारे देशवासिंयो करत देशाला चिंचा, बोरे, लोणचे दाखवा. कारण तुमची सोशल मिडीयाची टीम थकलीय आता.!!!*

तुमच्या हातुन सोशल मिडीयाचा लगाम सुटलाय. पुर्वी एक व्यक्ती संपुर्ण देशाबद्दल लिहीत होती मात्र आज *आख्खा देश एका व्यक्तीबद्दल लिहतोय.!!!*

"विकास वेडा झाला आहे", "काम की बात",  *"Save our pocket" अशा कित्येक हॅशटॅगने लोक बोलते झालेत, लिहीते झालेत. तुम्हालासुद्धा बुडाखालच्या आगीची धग जाणवतेय म्हणुनच लिहणारांना नोटिसी धाडुन दबावतंत्र वापरताय. अहो मोदीजी, अशा किती नोटीसी काढताल शंभर, हजार की लाख? करोडो लोक लिहतायत आणि पुढे पाठवतायत. !!!!

तुमच्या भांगेची नशा उतरलीय आता. *मोदीपर्व संपले आता "विचारपर्वाची" सुरुवात झाली आहे. !!!*

आता तुम्ही फक्त सोशल मिडीया वापरावर बंदीची आणीबाणी लादु शकता. बघा जमतेय का, कारण *मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है.....* 🇮🇳🇮🇳

#बडे काम की बात...

🖌

Comments