हज़ारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी - माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग
" हज़ारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी।' असे सांगत विरोधकांनी आरोपांचा उठवलेला धुरूळा शांत केला होता. सध्याचे सत्ताधारी भाजपने तात्कालीन प्रधानमंत्री असलेल्या मनमोहनसिंहांना कोसळा घोटाळ्याच्या आरोपांवरून घेरले होते. त्यावेळी संसदेत भाषण करताना मनमोहनसिंहांनी वरिल शेर आपल्या भाषणात सादर केला होता.
त्यानंतरच्या काळात देशभरात मनमोहनसिंहांच्या विरोधात ट्रोल लोक धूमाकूळ घालतं होते. मनमोहनसिंगाच्या फोटो वरून वेग वेगळ्या इमेजेश बनवून पसरवल्या जात होत्या. "मौनीबाबा" म्हणून चिडवले जात होते. मनमोहन सिंहाचे चारित्र्य हनन करण्याचा जेवढा म्हणून प्रयत्न करता येईल तेवढा केला जात होता. मात्र देशाच्या सर्वात मोठ्या बलशाली पदावर असतानाही मनमोहन सिंहांनी अशा ट्रोलधाडांना कसलाही त्रास दिला नाही.
परिणामी ट्रोलधाडांनी देशभरात गदारोळ करून मनमोहनसिंहाना बदनाम केले. अन् मोदी नावाचे झंझावातात देशाची सत्ता हस्तगत केली. विरोधीबाकावर असताना भाजपने युपीएच्या ज्या योजनांना आणि निर्णयांना विरोध केला. त्याच योजना राबवण्याचा सपाटा लावला. मनमोहनसिंह सरकारने देशाचे वाटोळे केले असल्याचे ढिंढारा पिटल्यानंतर मनमोहनसिंह सरकारने केलेल्या कामाचे उद् घाटन करण्यात धन्यता मानली.
त्यानंतर आता तीन वर्षात देशात लोकप्रियतेच्या नावाने भेफाम निर्णय घेतले अन् प्रसारमाध्यमांना हाताशी धरून आपल्या निर्णयाचे समर्थनही केले. मात्र, नोटबंदी आणि जीएसटीच्या झटक्याने सामान्यांची नशा उतरत आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर मनमोहनसिंहांनी राज्यसभेत केलेले सात मिनिटांचे भाषण पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं. त्यांनी दिलेला इशार खरा ठरला. अन् देशाचे सकल उत्पन्न ( जीडीपी) 2 टक्क्यांनी कमी झालं अन् सगळ्यांना मनमोहनसिंहाची आठवण आली.
नोटाबंदीमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात २ टक्क्यांची घट झाली आहे. रोजगार निर्मीतीला खिळ बसली आहे. नविन रोजगार निर्माण होण्याऐवजी आहे त्या नोकऱ्या गमवण्याची पाळी लोकांवर आली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याऐवजी अर्थव्यवस्था गंटागळ्या खात आहे. जगाच्या पोशिंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढच होत आहे. नोटबंदीने फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 40 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले.
देशाच्या आजच्या या अशा भयावह वातावरणात मनमोहनसिंहांची आठवण होत आहे. आज दिवसभर फेसबूक, ट्वीट्टरवर त्यांच्या वाढदिवसाला पडणाऱ्या पोस्ट बघितल्यावर याची तिव्रता जाणवते.
माजी प्रधानमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऊर अभिमानाने भरून येतोय. Dear Manmohan singhji happy Birthday
- ब्रह्मा चट्टे
Comments
Post a Comment