तू उड !
तू आनंद साजरा कर!
तू स्वतः चा विचार करायला शिक!
घरादाराची काळजी करते ना ?आता स्वतःची पण कर!
तुझ्यात एक अवखळ ,आनंदी मुलगी लपली आहे ग ,तिचे कौतुक कर!
फार नाही पण दिवसाचा एक तास स्वसाठी ठेव ,आणि त्या एका तासात तुला आवडेल ते कर !😊
तुझ्यातली ती मुलगी आहे ना ,तिला कधी कधी चुकायला पण आवडते ,तर चूक ! काही फरक पडत नाही !
पण जगण्यातला आनंद सतत शोधत राहा ,पावलोपावली सापडतो ग ,फक्त त्या मुलीला साथी ला घे 😊
मैत्रिणी बनव , एक्सप्रेस हो , कधी कधी ते डाएट बाजूला ठेवून मस्त पैकी मस्तानी खा ,😃 झाला काटा थोडा इकडे तिकडे काही फरक पडत नाही !👍
मिळाले कमी मार्क मुलांना कधी तरी तर जाऊ दे ना !
झाला वाद नवरोबांबरोबर होऊ देत ना !
वय झालंय आता , ह्यात काय ठेवलंय आता ! असले शब्द काढायचे नाहीत!कारण वाढते वय वाढू देत ना !
खूप केलंय सगळ्यांसाठी आता काढ वेळ तुझ्यासाठी!
तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून ,खात्री आहे मला सगळे घर हसेल ग , घरातील स्त्री आनंदी तर घर आनंदी !😊😊
ऐक माझे ! एक तास स्वतः साठी !!!
घेतला वसा टाकू नको , उगा कुढत जगू नको
कारण....
........
........
........
......."love you zindagiiiiiii
Love you zindagiiiiiiiiiii|💐💐💐💐💐
निळे आकाश पाहून काय येणार मनात विचार शेवटी ?
Comments
Post a Comment