परिवर्तन बघून सुर्यही तिचे

आज मी ऑफीसवरून घरी जात असतांना माझी एक जुनी  मैत्रीण भेटली.

मैत्रीण :- अरे संजू तु ?
hiiii
कुठे इकडे ?

मी :- अरे स्वाती !
hii
मी तर घरी जात होतो. खूप दिवसानंतर भेटलीस.
आई वडील कसे आहेत ?

मैत्रीण:- (हसून) सर्व एकदम मजेत आहेत इकडे मंदिरात गेली होती.

(बोलता बोलता माझे लक्ष तिच्या पायाकडे जाते.तिच्या पायात चप्पल नसतात )

मी :- अरे !
तुझी चप्पल कुठे आहे ?
मंदिरातुन कुणी चोरी तर केली नाही ना ?

मैत्रीण :- अरे नाही रे, माझे नवरात्रीचे उपवास चालू आहेत ना !
खूप कडक उपवास ठेवते मी.
नऊ दिवस चप्पल पायात घालत नाही. फक्त फळे खाऊनच दिवस काढते.

मी :-(हसून) हो का.
कशासाठी इतक्या परेशानीचा सामना करतेस.
यांनी काय होणार आहे ?

मैत्रीण :- माझी मनोकामना पूर्ण

मी :- कसली ?

मैत्रीण :- माझी काय मनोकामना असणार !
मम्मी पप्पाची तब्येत ठिक रहावी आणि मला एखादे चांगले स्थळ मागणी घालण्यासाठी यावे.
(हसून) अजून काय हवे मला ?

मी :- आणि तुला वाटते हे सारे नऊ दिवस चप्पल न घालता फिरल्यावर पूर्ण होईल ?

मैत्रीण :- हो !
तसा मला विश्वास आहे माझ्या देवीवर.

(बोलता बोलता मी बाजूला वळून बघतो, मला एक भिकारीन आणि तिची बारा वर्षाची पोरगी भीक मांगताना दिसते मी त्यांना आवाज देतो तसे ते दोघेही माझ्याकडे येतात.मी त्यांना दहा रुपये देतो आणि माझ्या मैत्रिणीला म्हणतो )

मी :- ही बघ, तीस वर्षाची भिकारीन आणि तिची बारा  वर्षाची पोरगी.
यांनी आयुष्यभर चप्पल नाही घातली तु तर उपवासाला फळे खातेस हे तर कित्येक दिवस फक्त पाणी पिऊन दिवस काढतात.
जर नऊ दिवस तु चप्पल नाही घातली तर तुझी मनोकामना पूर्ण होते, तर ही भिकारीन आजच्या घडीला अंबानीच्या घरात असायला पाहिजे.
स्वाती तु  B com आहेस.
आजच्या युगातले तु   फॉरिन  कल्चर आपलंसं केलं.
तुला माहीत आहे तुझे आई वडील बीमार पडले तर कुठला देव नाही त्यांना डॉक्टरच ठिक करणार.
तरीही देवांवर विश्वास ?

तु शाळेत शिकलीस विश्वाची निर्मिती कशी झाली.
तरीही ब्रम्हावर विश्वास.

तूला माहीत आहे माणसे चंद्रावर गेली तिथे त्यांनी संशोधन केले.
तरीही चंद्र देव आहे म्हणून त्याला आजही पूजतेस ?

तुला माहीत आहे मंदिरातील मूर्ती एका मूर्तिकारांची कलाकृती व्यतिरिक्त काहीही नाही तरी तिच्यावर इतका विश्वास.

स्वाती तु विज्ञानाच्या जगात विज्ञान वापरते पण त्याला आत्मसात केले नाही.

तू जरी आजच्या मॉडल जमान्यात वावरत असशील तरीही तुझी मानसिकता हजारों वर्षे पुर्वीचीच आहे.

(ती मला काही न बोलता तशीच निघून गेली. ती गेल्यानंतर मीही तिथून गेलो.दुसऱ्या दिवशी ती तिथेच थांबली माझी वाट बघत .तिने मला बघितले )

मैत्रीण :- हाय संजू

मी :- हाय !
हे काय चक्क चप्पल घालून आलीस.
सॉरी, मी काल तुला जरा जास्तच लेक्चर दिले.

मैत्रीण :- (रागाने ) खूप चांगले केले. मी तुझ्या बोलण्याचा रात्रभर विचार करत होते.
सत्याला शोधीत होते.

मी :- मंग, सापडले का सत्य.

मैत्रीण :- हो

मी :- काय आहे सत्य ?

( बाजूला भीक मागीत असलेली भिकारीन आणि तिच्या बारा वर्षाच्या मुलीला तिने आवाज दिला त्या धावत तिच्याकडे आल्या तिने पर्समधून दोन चप्पलचे जोड काढले आणि भिकारीन आणि तिच्या मुलीच्या पायात घातले )

मैत्रीण :- हेच आहे सत्य.
मी ठरवले आजपासून भुकेलेल्यांना अन्न
तहानलेल्यांना पाणी
गोर् गरीबांना आसरा होण्याचा प्रयत्न करीन.
संजु तु मला खऱ्या देवाचे दर्शन घडवले,धन्यवाद.

( ती हसत पुढे पुढे जात होती मी तीला बघत होतो. तिचे हे  परिवर्तन बघून सूर्य तीचे स्वागत करीत होता.वारा पुष्पवृष्टी करीत होता.झाडे टाळ्या वाजवीत होते.पक्षी गात होते.)

Comments