ग्रामपंच्यायत निवडणुक

ग्रामपंच्यायत निवडणुक २०१७

मि काय म्हणतोय 
लक्षात घ्या...
वापर मताचा झाला पाहिजे..
आपला नाही...
परत सांगतो...
वापर मताचा झाला पाहिजे, आपला नाही ....

क्रांतीतंत्र लक्षात घ्या...

* कोणीही आला तरी मत तुलाच हे सांगा...

* कुणाच्या डोळ्यावर येऊ नका...

* दहा दिवसात निवडणूक संपेल पण या काळात झालेली दुष्मनी कायम टिकते...
यामुळे कुणाच्या आध्यात.. मध्यात पडू नका..

* आपण नागरिक आहोत.. या भांडणात नुकसान आपले होईल असे वागू नका...

* कोणी जिंकला तरी भाकरीला पिठ देणार नाही...

* बाहेरच्या साठी घरात भांडण करू नका...

* कोणी दारू पाजली तर त्याला म्हणावे पुढील पाच वर्षे दारूचे पैसे आत्ता दे..
या पैशात मि काहीतरी कामधंदा करतो....

* फुकट मिळते म्हणून दारूचे व्यसन लावू नका

* या काळात कोणताही चुकीचा प्रकार करू नका...

* पोलिसांना सहकार्य करा...

* कायद्याचा भंग करू नका...

* मतदान करताना जात पात, पैसा, श्रीमती पाहू नका..चांगल्या लोकांना साथ द्या...

* मतदानाला जाताना मतदान स्लिप, ओळख पञ, आधार कार्ड जवळ ठेवा...
काही ठिकाणी ते एकत्र जोडलेही आहे...

* बोगस मतदान करू नका...

* तुम्ही केलेले मतदान कुणालाच कळत नाही यामुळे बिनधास्त मतदान करा...

* नंतर एखाद्या उमेदवार जिंकला म्हणून विरोधकांच्या दारात फटाके फोडू नका..
तो जिंकलाय तुम्ही नाही ...

* एखादा उमेदवार हरला म्हणून कुणाच्या घरावर हल्ले करू नका...

* या काळात जातीयवाद वाढवू नका...

* सर्वाशी प्रेमाने वागा...

* हा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे ...
लालूचा चालू बिहार नाही हे लक्षात ठेवा...

* अस वागा की फुलेनां आभिमान वाटेल...

सांगणे माझ काम आहे...

पटले तर घ्या...

नाहीतरी

किती दिवस 
आणि 
किती पिढ्या
केवळ बोंबलत राहणार...

अमके तमके आगे बढो 
हम तुम्हारे साथ है....

स्वतः पुढे जायचे बघा...
दुसऱ्याचा बाप मेला म्हणून स्वतःची केस भादरणे बंद करा...
आपल्या जिवंत बापाचा विचार करा...   

Comments