विकास वेडाच होता,पण प्रगती हुशार झालीये

विकास वेडाच होता,पण प्रगती हुशार झालीये

कोण आहे हा विकास
1947 साली विकास काँग्रेस चे बडे नेते, उद्योगपती , दलाल , नेत्यांचे जावई भाचे पुतणे , मुलं , साखर कारखानदार, गिरणीमालक , आमदार खासदार , दुध डेऱ्यांचे अध्यक्ष , यांच्या घरादारात विकास नांदत होता, गेली 60 वर्ष सगळी सरकार, सगळ्या संस्था यांच्याच विकास साठी राबत होत्या , त्यामुळे  हा विकास काई दिवसातच बिघडत गेला, आणि याचे नवाबी शौक वाढतच गेले ,मग याचे शौक  पुरवण्यासाठी अनेक योजना आणल्या गेल्या , त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे बोफोर्स घोटाळा , मग काय यांच्या विकास ला घोटाळ्यांची चटकच लागली मग कॉमनवेल्थ घोटाळा , 2जी घोटाळा ,जिजाजींचा जमीन घोटाळा , हेराल्ड घोटाळा, कोळसा घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, आशा अनेक योजना यांच्या विकास ला 5स्टार हॉटेलात धिंगाणा घालण्यासाठी , याला फॉरच्युनर घेण्यासाठी , याला विदेशात फिरण्यासाठी , याला परदेशात शिक्षण घेण्यासाठी , याला निवडणूका जिंकण्यासाठी आणल्या गेल्या , बिचारा विकास अजूनही नाराजच होता, मग काय याचे मायबाप गप थोडीच बसणारेत , याच्या संगोपनासाठी सगळ्या साखर कारखान्यांना लुबाडण्यात येऊ लागलं , सगळे दूध संघ नासवले गेले, गिरण्या बंद केल्या गेल्या , कृषी कर्जमाफीचा पैसाही यालाच पॉकेट मनी देण्यात आला,आणीबाणीच्या काळात तर म्हणतात विकास नंगा नाच घालत होता , एवढा लाडावलेला बेशिस्त बड्या घरचा विकास आता बेफाम झाला होता ,तो कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नव्हता , घोटाळ्यांच्या नशेत त्याला सामान्य मध्यमवर्गीय लोक ,गोरगरीब जनता यांच्या घरच्या    ' प्रगती ' वरती आता याची नजर पडली होती , आता गोरगरिबांच्या 'प्रगती' ची अब्रू धोक्यात आली होती , आता या मध्यमवर्गीयांच्या गोरगरिबांच्या 'प्रगती'ला ओरबडण्याची स्वप्न यांचा विकास पाहू लागला होता
मग अचानक या पिचलेल्या दबलेल्या सामान्य जनतेनं 2014 साली एक चमत्कार घडवला विकास ला अद्दल घडवायला यांनी एक मोदी नावाचा रखवालदार आणला , हा रखवालदार फारच शिस्तप्रिय होता .
विकास वेडा का झाला ?
या रखवालदारानी आल्याआल्या या बेभान विकास ला लगाम घालायला सुरुवात केली , यांनी विकास च्या लाडासाठी आणलेल्या योजनांची चौकशी चालू केली , मग विकास चा पॉकेट मनी बंद झाला , विकास चे अनेक फायनान्सर तुरुंगात जाऊ लागले , आता या बेधुंद विकास ला वेडाचे झटके येऊ लागले तो या रखवालदार मोदींच्या नावानं रात्रंदिवस शिव्या देऊ लागला , मग चौखूर उधळलेल्या विकास ला लगाम घालण्यासाठी आली नोटबंदी , आता पूर्णपणे भिकारी झालेला विकास पूर्णवेळ चा वेडा झाला , इतके वर्ष ओरबाडलेला सगळा पैसा त्याला बँकेत टाकावा लागला मग त्याच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी चालू झाली , त्याच्या घरादारावर धाडी पडू लागल्या , आता ठार वेडा झालेला विकास काश्मीर सारख्या ठिकाणी दगडी मारू लागला , इतर ठिकाणी रस्त्यावर येऊन मोर्चे काढू लागला , या रखवालदाराच्या नावानं शिव्याशाप देऊ लागला , या वेड्या विकास ला आता शॉक ट्रिटमेंट ची गरज होती म्हणून जीएसटी चा शॉक याला देण्यात आला , या शॉक नंतर विकास पिसाळलेलाच आहे , कारण याचे सगळे काळे धंदे आता रडारवर येणार होते , याला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गोरगरिबांच्या वाटा याला आपण टॅक्स म्हणू , विकास ला भरावा लागणार होता , मग काय विचारूच नका वेडाच शेवटी या विकास नीच मी वेडा झालोय म्हणून बोंब ठोकायला सुरुवात केली ,
या दरम्यान गोरगरिबांच्या घरची 'प्रगती' पहिल्यांदाच सुखाचा अनुभव घेत होती
कोण आहे ही प्रगती
मुघलांपासून , ब्रिटिश आणि नंतर काँग्रेस व त्यांची छोटीमोठी पिल्ल यांनी ज्या उघड्या नागड्या , पिचलेल्या ,गोरगरीब मध्यमवर्गीय रयतेला छळलं त्यांच्या घरी ही प्रगती नांदत होती , हिचे पालक गरीब म्हणून ही बिचारी कुपोशीतच राहिली , हिच्या समृद्धीसाठी मोदींनी मग योजना चालू केल्या , प्रगती ला लांब जंगलात प्रातविधी साठी जायला लागू नये म्हणून स्वछ भारत अभियान अंतर्गत प्रत्येक घरात संडास देण्यासाठी ही योजना आणण्यात आली , शेतात राबणाऱ्या प्रगतीच्या बापाला  मदतीसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना , प्रधानमंत्री कृषी सीचाई योजना आणण्यात आली कर्जात अडकलेल्या प्रगती च्या पित्याला सहाय्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणण्यात आली , शिवाराला पाणी मिळावं म्हणून जलयुक्त शिवार योजना चालू केली गेली , स्वातंत्र्या नंतरही साधं छत मिळू न शकलेल्या प्रगती च्या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरांची सोय करण्यात आली , प्रगती ला शिक्षण घेता यावं म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ योजना चालू करण्यात आली , सावकारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून जन धन योजना आणण्यात आली , गोरगरीब प्रगतीच्या पालकांना त्यांच्या वृद्धापकाळात मदत व्हावी म्हणून अटल पेन्शन योजना लागू करण्यात आली , प्रगतीला व तिच्या आईला जंगलातून लाकडं आणून धुरात स्वयंपाक करायला लागू नये म्हणून मागेल त्याला फ्री गॅस कनेक्शन साठी प्रधानमंत्री उज्वला योजना आणली , इंटरनेटच्या जमान्यात प्रगती आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर राहू नये म्हणून डिजिटल इंडिया योजना चालू केली गेली , मित्रानो गोरगरिबांच्या प्रगती साठी तुमचा रखवालदार , प्रधानसेवक , यांनी आणलेल्या योजनांचा हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर खूप मोठा आहे ,तुमच्या प्रगती साठी आणण्यात आलेल्या योजनांची संपूर्ण माहिती देत बसलो तर जागा पुरणार नाही, तुमच्या प्रगती साठी एक व्यक्ती अहोरात्र कष्ट करतीये , विकास च्या परिवाराचे शिव्याशाप घेऊन सुद्धा हा प्रधानसेवक मोदी अधिक उर्जेन काम करतोय ,  तुमची ही सर्वांगीण प्रगती बघून विकास आणि त्याचे परिवार वाले बावचळलेत , वेडेपिसे झालेत , त्यांना कितीही आरडा ओरडा करुद्यात पण गोरगरीबांची ही 'प्रगती एक्सप्रेस' अशीच सुसाट धावणार आहे , पण फक्त लक्षात ठेवा तुमच्या प्रगती ला बघून विकास चे परिवार वाले त्याला सुधरवण्यासाठी तुमच्या प्रगतीला मागणी घालतील , याना दारातही उभं करू नका , आणि हो तुमच्या घरची प्रगती त्यांच्या विकासासाठी पळवून न्यायचाही घाट घातला जातोय , तुम्हाला 2019 मध्ये पुन्हा याच रखवालदार मोदींना आणून तुमच्या प्रगतीला सुरक्षित करायचंय , मित्रानो विकास च्या वेडेपणावर बोंब मारणारे आज 5 स्टार हॉटेल मध्ये बसून टीका करतायेत , 60 वर्ष यांनी तुमच्या प्रगती चा वाटा चोरलाय , आता यांचं ऐकू नका
"गोरगरीबांची प्रगती हीच सरकारची प्रगती" हेच ध्येय घेऊन मोदी सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहेत ,म्हणून म्हणावसं वाटतंय विकास वेडाच होता पण प्रगती हुशार झालीये

'प्रगती' चा भाऊ!

Comments