आरक्षण; एक कळीचा मुद्दा

SC,ST,NT,VJNT,
VJ (ABCD) SBC,OBC

बांधवांनो,
भविष्यकाळाच्या पाऊलखुणा ओळखुन
आरक्षणाबाबत जागरूक व्हा !!!!
हा लढा दर्लक्ष करण्यासारखा नाही आपली बेफिकीर वृत्ती
येणाऱ्या पिढीचा विनाश करेल
हजारो वर्षाचा बॅकलाॅग ६० वर्षात पुर्ण झाला काय ?

तुमच्या मुळ गांवी असलेल्या बेरोजगारीचा तुंम्ही विचार करणार अहात की नाही ?
तुमची नोकरी तुमच्या आयष्यातुन कमी केली तर तु्म्ही कोण अहात शोधा स्वताला ?
तुमच्या नोकरीमुळे तुंम्हाला मान आहे .
नोकरी नसलेल्या तुमच्याच समाजातील तुमच्यापेक्षा अधिक शिकलेल्या  बेरोजगार तरूण/तरूणींची प्रतिष्ठा आणि तुमच्या प्रतिष्ठेमध्ये  आपले जातबांधव फरक का करतात ?

नोकरी मुळे तुमची प्रतिष्ठा आहे .
नोकरीशिवाय तुंम्हाला कुणीही मान देणार नाही .
तुमचे पुर्वज शिक्षणाविना जे बेरोजगारीचे अपमानीत जीवन जगले
तेच जीवन नोकरीशिवाय तुमच्या भावी पिढ्यांनी केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे  जगावे ही अपेक्षा आहे काय?

आपल्या भावी पिढ्यांनी लाचारीचे जीवन न जगता
सन्मानाचे जीवन जगावे
असे तुंम्हाला वाटत असेल
तर आरक्षण बचावच्या लढ्यात तन , मन, धनाने उतरणे आवश्यक आहे .

आमच्या हक्काचा लढा स्वाभिमानाने लढल्या जातो की आमच्या संघशक्तीचा लिलाव करून आमदारकी/खासदारकी मिळविण्यासाठी आंम्हाला
कुणाच्यातरी कच्छपी लावल्या जात आहे ?
याचाही आपण शिक्षित सुजाण नागरीकांनी विचार केला नाही तर कोण करणार आहे ?

म्हणुन आपल्या SC,ST,NT,VJNT,VJ(ABCD) SBC,OBC बहुजन बांधवांनी भविष्यकाळाच्या पाऊलखुणा ओळखुन सजग ,सतर्क रहावे आणि विश्वासु चळवळीच्या लढ्यात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आहे .
नाही तर मागासवर्गीय बहुजनांच्या दुफळीचा , अज्ञानाचा राजकीय फायदा करून घेणेसाठी राजकीय दलाल देव पाण्यात बुडवून बसलेले आहेतच .

तुम्ही ठरवा
आम्ही जाणार आहोत कुठे ?

Comments