रिपाइंचा 60 वा वर्धापन साजरा केल्याबद्दल टीका करणारी पोस्ट लिहिली आहे त्यांना झुंजार पत्रकार हेमंत रणपिसे यांचे सडेतोड उत्तर*

*ज्याने कोणी .ना रामदास आठवलेंवर  रिपाइंचा 60 वा वर्धापन साजरा केल्याबद्दल टीका करणारी पोस्ट लिहिली आहे त्यांना झुंजार पत्रकार हेमंत रणपिसे यांचे सडेतोड उत्तर* .............

संघर्षनायक रामदास आठवले साहेबांवर टीकेची आगपाखड करणाऱ्या अज्ञात अज्ञानी  मित्रा
तू मूर्ख आणि अर्धवट विचारांचा दीड शहाणा  दिसत आहे . तू भीमसैनिक असू शकत नाही .  आदरणीय केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवलेंबद्दल अवमानकारक पोस्ट लिहिल्या बद्दल तुझा मी तीव्र निषेध करतो .
तू  लिहिलेल्या पोस्ट मधून तुझे अज्ञान प्रकट होत आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिन  दि 3 ऑक्टोबर 2017  रोजी शिर्डी  येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले  यांच्या पुढाकारातून रिपाइं (ए) तर्फे  साजरा  झाला .मागील 25 वर्षांपासून  महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइंचा स्थापना दिन ना. रामदास आठवले हे त्यांच्या रिपाइं ( ए) गटातर्फे साजरा करतात .
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष स्थापन व्हावा . त्यासाठी रिपाइं चे ऐक्य व्हावा ;सर्व समाजच्या लोकांना रिपाइं मध्ये स्थान मिळावे यासाठी ना रामदास आठवले प्रयत्नशील असतात . डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षावर  आणि निळ्या झेंडयावर संघर्षनायक नामदार रामदास  आठवलेंचे जीवापाड प्रेम आहे . म्हणून ते रिपाइं  साठी जीवापाड मेहनत करतात.मुंबई असो की पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर नागपूर औरगाबाद नाशिक जळगाव धुळे  कोकण गोवा किंवा गुजरात मध्यप्रदेश महू भोपाळ इंदौर  आसाम कलकत्ता पश्चिम बंगाल पंजाब हरियाणा  कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीर  पर्यंत रिपब्लिकन पक्षाचे भरगच्च गर्दीचे मेळावे त्यांनी भरवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी दिलेला निळा झेंडा आणि रिपब्लिकन पक्ष गावागावात पोहोचविला आहे. एव्हडेच काय तर  ओरिसा  नागालँड  मणिपूर सिक्कीम या ईशान्य भारताच्या दुर्गम भागातही रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा घराघरात पोहोचविणारा संघर्षनायक सच्चा  भीमसैनिक  रामदास आठवलेसाहेब  आहेत .
मोठया प्रमाणात रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिन साजरा केल्याबद्दल प्रत्येक भीमसैनिकाला निश्चित च आठवलेसाहेबांचा अभिमान वाटेल .डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइंचा 60 वा स्थापना  दिन साजरा केल्याबद्दल ज्यांच्या पोटात दुखते त्याबद्दल ना रामदास आठवलेंवर टीका करतात ते कधीच भीमसैनिक असू शकत नाही . रिपाइं चा 60 वा स्थापनादिन साजरा झाला म्हणून ना रामदास  आठवलेंवर   टीका करणाऱ्यांचा  मी तीव्र निषेध करतो .
--- हेमंत रणपिसे
(भीमसैनिक)

Comments